0Shares

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून चाळीसगावात अल्पसंख्यांक समाजाने लसीकरणासाठी घेतला पुढाकार.. रिपोर्ट अभय पाटिल

आरिफ सय्यद मित्र मंडळाने घेतले हुडको परिसरात लसीकरण शिबिर

उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन

चाळीसगाव — भारत देश हा विविध समाज, विविध भाषांनी नटलेला आहे. समाज बदलला की समाजाचे राहणीमान, पेहराव,विचारधारा बदलत असली तरी मात्र आपले आयुष्य निरोगी राहावे या गोष्टीवर सर्वांचेच एक मत आहे.समाज कुठलाही असो आपला समाज निरोगी राहावा असे आपल्या परिसरातील नातेगोती , कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सतत वाटत असते. माञ यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून आज आरिफ सय्यद मित्र मंडळाने आपल्या अल्पसंख्यांक समाज बांधवांसह परिसरात राहणाऱ्या सर्वच घटकांच्या लसीकरणासाठी शिबिराचे आयोजन करून लसीकरणाची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिल्याने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सर्व देशवासीयांना लसीकरण देण्याचा हेतू साध्य होत असल्याचे गौरवोद्गार उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदाताई उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आज शहरातील हुडको कॉलनी नगरपालिका मंगल कार्यालय येथे लसीकरणाचे भव्य शिबिराचे आयोजन आरिफ सय्यद मित्र मंडळाने केले होते यावेळी संपदा पाटील बोलत होत्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आरीफ सैय्यद यांनी कार्यक्रमा मागची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले शासकीय जागी होणाऱ्या लसीकरण प्रसंगी तरूण मुली, तरूण महिला भगिनी, नवविवाहित महिला गर्दी असल्यानं इच्छा असून देखील लस घेण्याचे टाळत होत्या. याकरीता खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आज शिबीर घेतले. मी खासदार उन्मेश दादा यांचे आभार मानतो अशी भावना आरिफ सैय्यद यांनी व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी जहीर अली , वसीम मास्टर, सलीम सैय्यद, शाहिद मिर्ज़ा, मोहसिन शेख, सलमान शेख, अनीस सर, अल्ताफ़ शाह,मोहिसिन शेख साज़िया सैय्यद,आरीफ सैय्यद, जहीर अली ,वसीम मास्टर, सलीम सैय्यद, शाहिद मिर्ज़ा, मोहसिन शेख, सलमान शेख, अनीस सर, अल्ताफ़ शाह,मोहिसिन शेख=आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व प्रभागातील तरुण-तरुणी नवविवाहित महिला बंधू-भगिनींनी लसीकरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!