0Shares

चांदवड घाटात कंटेनर उलटला : चालक गंभीर जखमी चाळीसगाव, प्रतिनिधी अभय पाटील । सोयाबीनने भरलेला कंटेनर चाळीसगावकडे येत असताना चांदवड घाटातील वळणावर उलटल्याने चालकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना उघडकीला आली आहे.याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चैतन्य तांडा येथील रोहीदास धनसिंग राठोड (वय-४४) हे सोयाबीनने भरलेला कंटेनर (क्र. जी.जे-१२ बीवी ४५३७) घेऊन धुळेहून चाळीसगावकडे येत असताना चांदवड घाटातील वळणावर कंटेनर सकाळी ११ वाजेच्या सुमारास उलटले. दरम्यान,झालेल्या अपघातामुळे कंटेनर चालक रोहीदास धनसिंग राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघातात चालकाला जबर दुखापत झाल्याने त्यास चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील औषधोपचारकामी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रोहीदास राठोड हे एमआयडीसी येथील अंबुजा कंपनीत चालक म्हणून खासगी नौकरीला आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!