0Shares

वाघळी येथे पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू चाळीसगाव, प्रतिनिधी अभय पाटील । तालुक्यातील वाघळी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे अनंत चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचे निरोप घेण्यासाठी पोहायला गेलेल्या साहिल शरीफ शहा (वय-१०) व आयान शरीफ शहा (वय-१४) दोघेही रा. वाघळी यांचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान यातील एका मुलाचा मृतदेह तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर मिळून आले आहे. तर एकाचा शोध अद्याप सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र एका मुलाचा अजून मृतदेह सापडून न आल्यामुळे युद्ध पातळीवर शोध सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!