0Shares

समता सैनिक दलातर्फे चाळीसगाव शहरातील उपेक्षित पूरग्रस्तांना मदत पोहचली. रिपोर्ट अभय पटील
चाळीसगाव तालुका व शहरात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे हजारो लोकांचे अतोनात नुकसान झाले .अनेकांनी या पूरग्रस्तांना मदत ही केली .
चाळीसगाव शहरातील एबी हायस्कूल समोरील नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील राहणारे काही कुटुंब मात्र खूप नुकसानग्रस्त झालेले आहेत.पण या धावपळीच्या काळात दुर्दैवाने त्यांना योग्य ती मदत पोहचली नाही.
त्यातील एक वयोवृद्ध दिव्यांग निराधार महिलेने समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक मा.नानासाहेब बागुल यांना फोन करून त्यांच्यावरील आपबिती कळविली. बागुल साहेबांनी स्वतःहा सदर पूरग्रस्त परंतु मदतीपासून उपेक्षित या कुटुंबांना भेट दिली. सर्व पाहणी केली ,चर्चा केली. त्यानंतर थोड्याच वेळात या तिन्ही कुटुंबांना समता सैनिक दलातर्फे किराणा पोहचविण्यात आला . तिनही कुटुंबात कोणी ही पुरुष कमवता नाही.तिघी महिला विधवा आहेत.निराधार आहेत. त्यातील एक महिला एका पायाने अधू आहे .पुराचे पाणी 5 ते 7 फूट इतके त्यांच्या घरात घुसले होते.त्यामुळे घरातील भिंती पडल्या आहेत . काही भिंती केव्हा ही पडतील अशा अवस्थेत आहेत थोडाफार किराणा होता तो देखील पाण्यात वाहून गेला ,खराब झाला.आता या कुटुंबांचे राहण्याचे, खाण्या पिण्याचे अतोनात हाल होत आहेत.
नानासाहेब बागुल यांच्या सूचनेनुसार समता सैनिक दलातर्फे ज्येष्ठ सैनिक सुजित जाधव, तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव ,तालुका संघटक दीपक बागुल कार्यालय सचिव नितीन मरसाळे ,शुभम जाधव यांनी संबंधित कुटुंबांना मदत पोहचविली .
या कुटुंबांना आणखी कोणाला मदत द्यायची असेल तर आणखी बरे होईल.
आपला

समता सैनिक दल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares