0Shares

चाळीसगाव शहरात राज्यातील पहिला लसीकरण महोत्सव रिपोर्ट इमरान शाह

विक्रमी १५ हजार लसवंत

जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव येथील दोन्ही महाविद्यालयात लसीकरण मोहीम

जळगाव – जळगाव लोकसभा मतदार संघातील कोरोना मुक्त शहरासाठी पहिला लसीकरण महोत्सव चाळीसगाव येथे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून सूरू असून आज येथील धुळे रोड वरील चाळीसगाव महाविद्यालय तसेच हिरापुर रोड वरील नानासाहेब यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात लसीकरणाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणावर सहभाग नोंदविल्याने
राज्यातील पहिला कोरोना मुक्त महाविद्यालय पॅटर्न राज्यात लोकप्रीय ठरला आहे.

गेल्या चार दिवसापासून चाळीसगावात विविध ठिकाणी लसीकरण मोहिमेतून शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून कोरोना लसीकरण महोत्सवाला शहरवासीयांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून
लसीकरण मोहीम सुरू आहे.जळगाव लोकसभा मतदार संघातील चाळीसगाव शहरात पहिला लसीकरण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गेल्या चार दिवसात 15 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून आज चाळीसगाव येथील धुळे रोड वरील महाविद्यालय तसेच हिरापुर रोड वरील नानासाहेब यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या दोन महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण शिबिर आयोजित केल्याने खासदार उन्मेशदादा पाटील यांचा राज्यातील पहिला कोरोना लसीकरण महोत्सव राज्यात आदर्श ठरला आहे गेल्या चार दिवसांपासून सातत्याने चाळीसगाव शहरातील विविध प्रभागात, विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.गेल्या आठ तारखेला शहरातील 13 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे अकरा हजार नागरिकांना एकाच वेळी लसीकरण करण्यात आले सर्वाधिक 990 लसीकरण शहरातील चौधरी वाडा केंद्रावर करण्यात आले आहे. गेल्या सोमवारी सौरव पाटील मित्रमंडळाने धुळे रोड येथे अतिशय यशस्वीपणे शिबिराचे आयोजन केले होते या नंतर मोठ्या प्रमाणात खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे सामाजिक संघटना सामाजिक संस्था विविध आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासंदर्भामध्ये मागणी केली होती या अनुषंगाने जळगाव लोकसभा मतदार संघातील चाळीसगाव शहर येथे प्रायोगिक तत्त्वावर कोरोना मुक्त ,लस मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी थेट केंद्रातील आरोग्य मंत्री यांच्याशी संपर्क करून चाळीसगाव शहराचा लसीकरण मुक्त पॅटर्न होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या अनुषंगाने आज देखील विविध प्रभागांमध्ये लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे.
18 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नवविवाहितांनी मोठ्या प्रमाणावर घेतला लाभ

आज 18 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नवविवाहितांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रावर गर्दी केल्याने हा लसीकरण महोत्सव राज्यात आदर्श ठरला असून याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

राज्यातील पहिला कोरोना मुक्त पॅटर्न

शहरातील नानासाहेब यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आज शिबिराचे उद्घाटन चेअरमन डॉ एम.बी.बापू पाटील यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस डी महाजन, उपप्राचार्य डॉ. यु.आर.मगर, एनएनएसचे प्रा. डॉ. ए एल सूर्यवंशी, प्रा. डॉ. जी.बी.शेळके, प्रा डॉ आर. पी. निकम, प्रा. श्रीमती मंगला सूर्यवंशी, प्रा. डॉ. स्वप्नील वाघ ,प्रा. डॉ.आर बी चव्हाण, प्रा. एस एम पाटील, प्रा.डॉ.व्ही.आर.चव्हाण,परिचारिका जयश्री चव्हाण, प्रज्ञा राजू लोखंडे,प्रा. के पी रामेश्वरकर, रोटरीचे डीस्ट्रिक सेक्रेटरी समकित छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच धुळे रोड वरील चाळीसगाव महाविद्यालयात प्राचार्य डॉ.एम व्ही बिल्दीकर
उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, प्रा. डॉ. अजय काटे, एन एन एस चे प्रा. गौतम सदावर्ते, प्रा. आर आर बोरसे, प्रा. डॉ. एन एम नन्नवरे, प्रा. मेघराज सुडे प्रा.पंकज वाघमारे ,प्रभाकर पगार ,दीपक पाटील, विजय बाविस्कर, हिम्मत अंदुरे आधी मान्यवर उपस्थित होते
उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा ताई पाटील यांनी दिल्या भेटी
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून त्यांना विविध ठिकाणी मुलाखतीला जाताना व पुढील शिक्षणासाठी जाताना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने आज या दोन्ही केंद्रांवर विद्यार्थ्यांनी लस घेण्यासाठी झुंबड केली होती. यावेळी उमंग समाजसेवी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी विविध लसी केंद्रांवर जाऊन भेटी दिल्यात. याप्रसंगी विद्यमान अध्यक्षा साधनाताई पाटील, पि एम मोदी ऑर्गनायझेशन तालुका उपाध्यक्ष सर्वेश पिंगळे, सचिन चौधरी, डॉ संदीप देशमुख, नाट्य कलावंत तथा आयोजक साहेबराव काळे, नगरसेवक गणेश महाले, सागर चौधरी, आरोग्य दूत बबडी शेख, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेन्द्र काका जैन, रोटरी क्लबचे डीस्ट्रिक सेक्रेटरी समकित छाजेड अमीत सुराणा, सुनिल रणदिवे, विनायक वाघ आदी मान्यवर उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares