0Shares

धरणगांव ग्रामीण रूग्णालयास सिजेंटा(बियाणे) कंपनी तर्फे पाच हायड्राॅलिक बेड भेट..

धरणगाव प्रतिनिधी, धनराज पाटिल, सबला उत्कर्ष:-धरणगाव ता.धरणगाव कृषी क्षेत्रात अग्रेसर असणारी सिजेंटा इंडीया लिमिटेड कंपनीने धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयास पाच हायड्राॅलीक बेड उपलब्ध करून दिले.कोरोना काळात अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तर काहींना यात जिव देखील गमवावा लागला.समाजासाठी देणं म्हणुन धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयाची गरज ओळखून सिंजेटा कंपनी ने बेड भेट दिले.यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ.,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी याच्या शुभहस्ते पाच सुसज्ज बेडचे चे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी ,उपनगराध्यक्ष विलास महाजन., गटनेते विनय भावे ,शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे.,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन.,शिवसेना विभाग प्रमुख संजय चौधरी,आस्था अग्रो चे संचालक माधव पाटील,मुकेश अग्रो चे संचालक राजेन्द्र पाटील, लक्ष्मीनारायण अग्रो चे संचालक प्रदीप पाटील व प्रतीनीधी गोविंदा , योगेश पाटील तसेच रुग्णालयीन कर्मचारी महेंद्र माळी, अविनाश चौधरी.,शिवसैनिक शैलेश महाजन.,गोपाल चौधरी.,अरविंद चौधरी व शेतकरी बांधव उपस्थित होते.यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी पुढील काळात व्हेंटिलेटर किंवा बाय पाईप मशीन उपलब्ध करून द्यावे असे कँपनी चे विभागीय व्यवस्थापक यांच्या कडे मागणी केली.*सिजेंटा कंपनी ने ग्रामीण रुग्णालयात हायड्रोलिक बेड भेट दिले त्यामुळे रुग्णांचे गैरसोय होणार नाही व अतिशय उच्च दर्जाचे बेड भेट दिले बद्दल कँपनी चे विभागीय व्यवस्थापक सुधीर आखाडे यांनी सुत्रसंचलन केले. तसेच आभार डाॅ. गिरीश चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालय तर्फे मानले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares