0Shares

*दिल्ली व पुणे बलात्कार प्रकरण नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिति तर्फे नराधमांना कठोर शिक्षेची मागणी*

रिपोर्ट सलमान शाह

आज दी.9-9-2021 रोजी नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिति तर्फे दिल्ली व पुणे येथील बलात्कार प्रकरणी जिल्ह्यातुन OTP निवेदन देण्याचे आव्हान करण्यात आले होते.त्या अनुषंगाने तमाम नाशिक जिल्ह्यातील पद अधिकाऱ्यानी उत्फुर्स प्रतिसाद देत दिल्ली आणि पुणे बलात्कार प्रकरणातील पिडितेला न्याय मिळण्यासाठी समितीच्या सदस्य व पधाधिकार्यांनी जिल्ह्याभरातुन एकाच वेळी निवेदन देण्यात आले. 27 ऑगस्ट दिल्ली येथील संगमविहार येथे राहणारी व दिल्ली पोलिस डिफेंस मधे कार्यरत साबिया सैफी हिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. तसेच पुणे येथेही 31 ऑगस्ट रोजी मुम्बई येथे जाणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गोड बोलून अपहरण करून वनवाडी येथे नेऊन सात ते आठ नराधमांनी दोन दिवस अत्याचार केला.त्या निषेधार्थ मुस्लिम उत्कर्ष समितिने निवेदनाचे आव्हान केले होते. मनमाड, नांदगाव, चांदवड, येवला, लासलगांव, निफाड, ओझर, देवळा, कळवण, सटाणा, वणी, पेठ, सुरगाणा, या सर्वच ठिकाणाहुन नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. येवला प्रान्त कार्यालय येथे मोठ्या संखेने पदअधिकारांच्या हजेरीने निवेदन देण्यात आले. समितिचे ग्रा.जिल्हाध्यक्ष सादिक पठान यांनी केंद्रात मोदी सरकार असून सुद्धा दिल्लीत असले प्रकार घड़तात याची खंत व्यक्त केली. तसेच समितीचे मार्गदर्शक रईस फारुकी यांनी महिलांची काय सुरक्षा असा सवाल उपस्तितित केला.?जिल्हासंपर्क प्रमुख अल्ताफ शाह यांनी हया सर्व गुन्ह्याची सी.बी. आय. चौकशी व्हावी. व गुन्हेगारांना त्वरित फाशी व्हावी अशी मागणी केली.त्या वेळी येवल्याचे मा.नगराध्यक्ष हाजी शफीक शेख, ऐजाज मेंबर,रिजवान मेंबर,नांदगांव ता.अ .संख्याक अध्यक्ष हबीब शेख, आबीद सय्यद, मोहम्मद नवाब शेख, बाबा पठान, हमजा मंसूरी, आझाद पठान, अकील शेख, मोहसिन शेख, इसरार शेख, नदीम सय्यद, वसीम सय्यद, अकबर शेख, जाविद शाह, इमरान चिराग शेख, फैजु पठान, लल्या पठान, इमरान पठान,जमीर शेख,अनवर अजमेरी,समीर खान व अन्य पधाधिकारी उपस्तित्तीत होते.मुस्लिम उत्कर्ष समिति ही सर्व समाजातील सर्वांच्या न्याय हक्का साठी तत्पर असून पीड़ित, शोषित, वंचित व तळागळातील गोरगरीब जनते साठी लढ़ा देत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares