0Shares

तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार..

डॉ. सुनील साबळे हा घानेगाव, तालुका: घनसावंगी, जिल्हा: जालना येथील रहिवासी आहे. सुनील चे वडील हे शेतकरी आहेत. घरातील कोणीही उच्चशिक्षित नाही. सुनिल हा गावातील पहिला Engineer आहे. घानेगाव हे 1500 लोकसंख्या असलेले छोटे से गाव. गावामध्ये फक्त चौथी पर्यंत शाळा आहे. त्यानंतर बाकीच्या शिक्षणासाठी त्यांना जांब समर्थ येथे पांच किलोमीटरवर दररोज पायी यावे लागते. सुनिल ने दहावी पर्यंत चे शिक्षण शिवाजी विद्यालय, जांब समर्थ येथे पूर्ण केले. सुनिल हा खुप हुशार, जिद्दी, व मेहनती मुलगा होता व नेहमी वर्गामध्ये प्रथम असायचा. सरांचा तर तो खुप आवडता विद्यार्थी होता. अजून पण तो सर्व सरांच्या संपर्कात असतो व गावी गेला की भेटत असतो. नंतर त्याने डिप्लोमा इन केमिकल Engineering, Government Polytechnic, Jalna येथे फर्स्ट क्लास with distinction (81%) घेऊन पूर्ण केले. यानंतर त्याने Syndicate बँक Jamb Samarth या बँकेकडून Education loan घेऊन graduation व post graduation सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठातून फर्स्ट क्लास मध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्याने *CSIR Government of India sponsored project वर *Research Associate या पदावर जॉईन केले हा तीस लाख रुपयाचा Government स्पॉन्सर्स प्रोजेक्ट होता. Government ने त्याला fellowship व सर्व रिसर्च चा खर्च दिला. त्याने Development of degradable polymeric materials using organic additives या topic वर रिसर्च केला व त्यांना प्रा:डॉ Haripada Bhunia व प्रा: डॉ Sanjeev Kumar Ahuja यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी 6 International paper published केले. त्यांनी 4 International व National conferences मध्ये भाग घेतला. त्याचा पीएचडी चा thesis हा जपान या देशात व Indian Institute of Technology येथील scientist ला पाठविण्यात आला व दोन्ही Scientist ने सुनिल चे रिसर्च वर्क स्विकारून त्याला *A ग्रेड दिला व आता त्याला Thapar University, Patiala, Punjab यांनी Chemical Engineering मध्ये पीएचडी डिग्री दिली आहे. गावातील सर्व लोकांनी, मित्रांनी व गुरुजनांनी त्यांचे खुप कौतुक केले आहे व सर्वाना त्याचा खुप खूप अभिमान आहे. गावातील पहिला Engineer ते पीएचडी डिग्री पर्यंत त्याला खुप प्रॉब्लेम आले परंतु त्याने त्यावर मात केली आहे व स्वतः चे ध्येय साध्य केले आहे. त्याला कोणाचे ही वेळेवर मार्गदर्शन लाभले नाही परंतु त्याला भगवंताची साथ होती व त्याने त्याच्या जिद्दीने, इमानदारीने व मेहनत करून स्वतः चे ध्येय संपादन केले आहे. आता त्याची इच्छा आहे बाहेर च्या देशात जाऊन पुढील शिक्षण/Research करायचा व माझ्या गावाचे व देशाचे नाव रोशन करायचे.

प्रा: डॉ. सुनिल सटवाजी साबळे
रा: न्यू हनुमान नगर, गारखेडा परिसरजिल्हा: संभाजी नगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares