गंगापूर चे तहसीलदार व महसूल सहाय्यक लाच स्वीकारल्याने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात…

सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी औरंगाबाद
औरंगाबाद – तहसील कार्यालय गंगापूर चे अविनाश महादेव शिंगटे पद – तहसीलदार वर्ग-1 , व अशोक बाबुराव मरकड पद-महसूल सहायक , वर्ग-3 तहसील कार्यालय गंगापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांनी तक्रार दार यांचे मौजे आपेगाव तालुका गंगापूर येथे वडिलोपार्जित असलेल्या जमीन गट नंबर 19 मधील सातबारावर असलेल्या कुळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर शेरा कमी करण्यासाठी यांच्याकडून 1,25000/- रुपये लाचेची मागणी केली असता व पहिला हप्ता 70 हजार रुपये लाच स्वीकृतीस मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले.
यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद तर्फे सापळा आयोजित करून अविनाश माधव शिंगटे पा तहसीलदार वर्ग-1 तहसील कार्यालय गंगापूर ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद यांनी अशोक बाबुराव मरकड वय 55 वर्षे महसूल सहायक वर्ग-3 तहसील कार्यालय गंगापूर ता.गंगापूर जि. औरंगाबाद यांच्यामार्फतीने पहिला हप्ता 70 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले . यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गंगापूर, औरंगाबाद (ग्रामीण) येथे गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया सुरू आहे .
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. राहुल खाडे अप्पर पोलीस अधीक्षक मा. डॉ. अनिता जमदार पोलीस उपअधीक्षक श्री बी व्ही गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक मारुती पंडित यांनी केले आहे .
त्यांना या कामी पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोना-प्रकाश घुगरे , भूषण देसाई , पोलीस आमदार आमदार पोलीस अंमलदार मिलिंद इप्पर यांनी मदत केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *