शिवसेनेचे जिल्ह्यातील वाटचाल धडाकेबाज…

शिवसेनेचे जिल्ह्यातील वाटचाल धडाकेबाज.

जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघांच्या पाठीवर उध्दव ठाकरेंची कौतुकाची थाप

धरणगाव – प्रतिनिधी,धनराज पाटिल:- सबला उत्कर्ष न्यूज –
कोरोनाशी मुकाबला असो की, शेतकरी कर्जमुक्ती, पिक विमा यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेने केला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. सामाजीक कार्याच्या माध्यमातून शिवसेनेने केलेली जिल्ह्याततील राजकीय वाटचाल धडाकेबाज असल्याची कौतुकाची थाप पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या पाठिवर दिली. शिवसेनेच्या वाटचालीची माहिती व्हीडीओ कॉन्फसिंगव्दारे उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांकडून जाणून घेतली. याप्रसंगी गुलाबराव वाघ यांच्या कार्याची त्यांनी विशेष दखल घेतली हे विशेष.
मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून सरकारच्या माध्यमातून जनसेवेची कामे करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आग्रही आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज सरकार पर्यंत पोहचविण्याची अपेक्षा त्यांना आहे. म्हणूनच मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतूनही वेळ काढून ते जिल्हाप्रमुखां सोबत व्हीडीओ कॉन्फसिंगव्दारे सातत्याने संपर्क साधत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीच्या ‘ड्राय रन’, ग्रामपंचायत निवडणूका याबाबतची माहिती त्यांनी नुकतीच राज्यातील जिल्हाप्रमुखांकडून घेतली. याप्रसंगी जळगावची माहिती जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली.
शेतकरी कर्जमुक्ती, पिक विमा याबाबत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी महिती दिली. जिल्ह्यातील काही पात्र शेतकऱ्यांची तांत्रिक आडचणींमुळे कर्जमाफी झालेली नसल्याचा मुद्दा गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्देशनास आणून दिला. कोरोनाचा कहर आता नियंत्रणात आल्याचे सांगून कोरोना काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामाचा गौरवपुर्ण उल्लेख श्री.वाघ यांनी केला. दमदार सामाजीक कार्यामुळेच ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेने आघाडी घेतल्याचे श्री.वाघ यांनी सांगितले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील आठ तालुक्यातील 73 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याअसून यात 31 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. महाआघाडीच्या माध्यमातून 31 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन तर विरोधी पक्ष भाजपाच्या वाट्याला 5 तर अपक्षांच्या वाट्याला तीन ग्रामपंचायती आल्याची माहिती गुलाबराव वाघ यांनी दिली. या आकडेवारीवरून शिवसेना आणि महाविकास आघाडी यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड स्पष्ट होत असल्याचे सांगून ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनाच क्रमांक एकच पक्ष राहिल असे वचन गुलाबराव वाघ यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले.
गुलाबराव वाघ यांनी दिलेल्या माहिती नंतर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. समाजकार्याच्या माध्यमातून शिवसेनेची राजकारणातील वाटचाल जळगाव जिल्ह्यात सुरू असल्याचे कौतुक त्यांनी केले. येथील पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, आ.सौ.लताताई सोनवणे आणि शिवसैनिकांचे त्यांनी अभिनंदन करून जनसंपर्क कायम सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

ना.गुलाबराव पाटील
यांचा विशेष उल्लेख
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधत असतांना गुलाबराव वाघ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांचा विशेष उल्लेख केला. पालकमंत्री श्री.पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे शिवसेनेच्या माध्यमातून शिवसैनिकांनी आणलेली सामाजीक कामे त्वरीत होत आहे. पालकमंत्री थेट शिवसैनिकांच्या संर्पकात असल्यामुळे शिवसैनिकांनाही काम करण्याची उर्जा मिळत असल्याने आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दुपटीने वाढलेली दिसेल असे ही गुलाबराव वाघ यांनी सागितले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *