वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी युवक कडून रक्तदान शिबिराचे आयोजन…

वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी युवक कडून रक्तदान शिबिराचे आयोजन.
वडगावशेरी : सबला उत्कर्ष :- शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजन. राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला परिसरातील नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.८५ नागरिकांनी रक्तदानासारखे श्रेष्ठदान केले.यामध्ये जेष्ठ, तरुण-तरुणी व महिला वर्गाचा मोठा वाटा आहे.यावेळी माहिती देताना वडगावशेरी मतदारसंघाचे युवक अध्यक्ष किरण खैरे यांनी सांगितले की राज्यामध्ये सध्या कोरोनाच्या ह्या संकट काळात रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असताना पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व त्यांना एक वाढदिवसाची भेट म्हणून आम्ही सर्व युवक कार्यकर्त्यांनी ह्या शिबिराचे आयोजन केले आहे.
यावेळी मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे , मतदारसंघाचे अध्यक्ष नाना नलावडे,माजी अध्यक्ष राजेंद्र खांदवे,युवक प्रदेश उपाध्यक्ष राकेशनाना कामठे, युवक शहराध्यक्ष महेशदादा हांडे, युवक शहर उपाध्यक्ष जावेदभाई इनामदार, जेष्ठ नेते फहिम शेख, वडगावशेरी मतदार संघाचे युवक अध्यक्ष किरण खैरे, संघटक सचिव राजेश आबनावे, उपाध्यक्ष सुहास तळेकर,सोशल मीडिया चे अध्यक्ष सागर धारशिवकर, संघटक सचिव सुयोग जाधव, कुलदीप शर्मा, विद्यार्थी उपाध्यक्ष अजय पवार व रोहित खोसे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कार्याध्यक्ष सागर खांदवे यांनी उत्तम रीत्या केले व रक्तदात्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासुन आभार मानले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *