वडगांवशेरीकरांची तहान लवकरच भागणार – आ. सुनील टिंगरे…

वडगांवशेरीकरांची तहान लवकरच भागणार .
वडगांवशेरी (पुणे) :- सबला उत्कर्ष न्यूज…
भामा‐आसखेड चे काम आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातुन पुर्ण.
गेली सात वर्षे रखडलेल्या भामा-आसखेड प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे.या प्रकल्पाला अजित पवार यांनी २०१३ साली मंजुरी दिली होती,परंतु नंतरच्या काळात सत्ता बदल झाल्याने हे काम रेंगाळत पडले.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पालकमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने व वडगांवशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातुन हे काम एका वर्षात पुर्ण करण्यात आले, यासाठी संपुर्ण वडगांवशेरीकरांनी महाविकास आघाडी सरकारचे व आमदार सुनील टिंगरे यांचे आभार मानले. येत्या आठवड्यात पाईपलाईनची चाचणी झाल्यावर प्रत्यक्षपणे नागरिकांच्या घरी पाणी पोहचेल अशी माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *