माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण…

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण…

जळगाव : मयूर वागूळदे ( सबला उत्कर्ष ) :- माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील रोहिणी खडसेंसह चार जणांनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आज स्वतः एकनाथ खडसे यांनी आपल्या ट्विटर या अधिकृत खात्यावरून माहिती देऊन जनतेला आवाहन केले आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे >> माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल. असे त्यांनी ट्विटर वर दिले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांचे कुटुंब या आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे हीच रिड जळगाव न्यूज कडून देवाकडे प्रार्थना !

माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *