महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी, नगराळे महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस !

महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी, नगराळे महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस !

मुंबई : सबला उत्कर्ष प्रतिनिधी – महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या बदलीनंतर राज्यातील महासंचालक पद रिक्त झालं होतं. या रिक्त पदावर आता हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत. सुबोधकुमार जयस्वाल यांच्यानंतर सेवाजेष्ठतेनुसार आधी संजय पांडे यांचा  नंबर लागतो. मात्र संजय पांडे हे या वर्षीच जून महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सेवाजेष्ठतेनुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हेमंत नगराळे यांची पोलिस महासंचालक पदावर वर्णी लागली आहे. हेमंत नगराळे  यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तपदाचा भार स्वीकारला होता. २०१८ मध्ये त्यांची नागपुरात  बदली झाली होती. नगराळे पोलिस विभागातील विधी आणि तंत्रज्ञान विभागातील महासंचालक म्हणून कार्यरत आहेत

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *