भाजपने घेतली आक्रमक भूमिका उत्तर महाराष्ट्रातील खासदारांचे मराठा आरक्षणाला जाहीर समर्थन जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे मराठा आरक्षणाला समर्थन…

रावेर :- सबला उत्कर्ष(प्रतिनिधी):- रक्षा खडसे व उन्मेष पाटील या जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिले असून याबाबतचे निवेदन खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांना समर्थन पत्र देण्यात आले.सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील महाविकास आघाडीने कोर्टात बाजू व्यवस्थीत न मांडल्याने ही स्थिती उदभवल्याचा सामाजिक संघटनांनी आरोप केला आहे. तर भाजपनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आरक्षणाला जाहीर समर्थन दिले आहे. दरम्यान,जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील व रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या सहकारी खासदारांसह आज छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले.याबाबतचे निवेदन देखील त्यांना देण्यात आले. याप्रसंगी उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांच्यासह खासदार डॉ.हिना गावीत,डॉ.भारती पवार,प्रितम मुंडे व सुजय विखे हे खासदारही उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *