पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत बिनविरोध…

पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत बिनविरोध.

  • सांगवी ग्रामपंचायतीत आता महिला राज :
    पाचोरा ✒️ प्रतिनिधी ( Sabla Utkarsh News )
    पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. ग्रामपंचायतीतील सर्वच सात जागांवर महिला सदस्यांची एकमताने निवड करत गावाने निवडणुक बिनविरोध करुन एक आदर्श ठेवला आहे.
    आमदार किशोर पाटील यांचे आवाहनाला प्रतिसाद देत सांगवी प्र. लो. ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. यात वार्ड क्रं १ – वंदनाबाई श्रीराम वाघ (पाटील), संगिताबाई अशोक पाटील, शोभाबाई संतोष तेली, वार्ड क्रं. २ – सुमित्राबाई गुणवंत पाटील, कु. दिप्ती संजय पाटील, वार्ड क्रं. ३ – सुवर्णा अधिकार पाटील, कमलबाई हरी सुरवाडे या सात महिला बिनविरोध निवडुन आल्या आहेत. सदर निवडणूक बिनविरोध करणे कामी शशिकांत गोविंदराव पाटील, अभिमन सिताराम पाटील, अधिकार अमृत पाटील, परशुराम संतोष पाटील, चंद्रकांत सांडू पाटील, राजेन्द्र भावजी पाटील, ज्ञानेश्वर युवराज पाटील, उत्तम सुपडू तेली, गुणवंत रामराव पाटील, हरी सखाराम सुरवाडे
    यासह सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने प्रयत्न केला.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *