पत्रकारांना धमकी देणारा मुजोर रेल्वे कर्मचारी छोटेलाल पांडे च्या चौकशीला सुरुवात…

पत्रकारांना धमकी देणारा मुजोर रेल्वे कर्मचारी छोटेलाल पांडे च्या चौकशीला सुरुवात.

२ तासांच्या आत अंधेरी रेल्वे पोलिसांनी केली चौकशीला सुरुवात.

तात्काळ केलेल्या अंधेरी रेल्वे पोलिसांच्या कारवाई ला सेंट्रल प्रेस चा सलाम.

विशेष प्रतिनिधी ( सबला उत्कर्ष न्यूज ) :-
वरिष्ठ पत्रकार तसेच सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर व मुंबई डेज साप्ताहिक वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक अरविंद बनसोडे हे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 रोजी एका महत्त्वाच्या वृत्तांकनासाठी चर्चगेट या ठिकाणी जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी अंधेरी पूर्व तिकीट काउंटर येथे गेले असता त्या ठिकाणी कार्यरत असणारा छोटेलाल पांडे यांनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलून तिकीट देण्यास नकार दिला व त्यांना धमकी देऊन अर्वाच्य भाषेत बोलून त्यांना अपमानित केले.
या बाबतची बातमी सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्यांना कळताच त्यांनी संपूर्ण सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे निषेध व्यक्त केला.
दरम्यान या संबंधीतची तक्रार ही संदिप कसालकर यांनी रेल्वे पोलीस मुंबई आयुक्त रविंद्र सेनगांवकर यांना निदर्शनास आणून दिली असता रेल्वे पोलीस आयुक्त मुंबई रविंद्र सेनगांवकर यांनी ही घटना गांभीर्याने घेऊन तात्काळ अंधेरी रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे सदर विषय हा अग्रेशीत करून यावर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले. सदर विषयाचे गांभीर्य ओळखून व.पो.नि. निकम यांच्या निर्देशानुसार अंधेरी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक सचिन कांबळे यांनी संदिप कसालकर यांना फोनद्वारे संपर्क करून अंधेरी रेल्वे पोलीस चौकीत बोलावून त्यांच्याकडून सदर घटनेबाबाबत माहिती घेतली. अंधेरी रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांनी सदर प्रकरणाबाबत योग्य ती विचारपूस करून रेल्वे तिकीट कर्मचारी छोटेलाल पांडे यांचे पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनाबाबत रेल्वे विभागात त्यांचेबाबत योग्य ती माहिती सादर करून तसा अहवाल रेल्वे प्रशासनास पाठवू असे सांगितले.
सदर घटनेबाबत निवेदन हे व.पो.नि. दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक सचिन कांबळे व पोलीस उपनिरीक्षिका मूलगीर यांच्या उपास्थितीत देण्यात आले.
दरम्यान या वेळेस उपस्थित सुवर्णरत्न फाऊंडेशन च्या मुंबई अध्यक्षा व मुंबई रेल्वे पोलीस मित्र प्रीती पवार, उपाध्यक्षा सरोजा अन्नलदास यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि छोटेलाल पांडे च्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. इंडिया २४ तास मराठी वृत्तवाहिणीच्या मुंबई प्रतिनिधी धनश्री रेवडेकर, व्हिडीओ जर्नलिस्ट जितेश देशमुख यांनी सुद्धा या वेळेस उपस्थती दर्शविली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *