नांदेड येथील खासगी रुग्णालयात वेळेवर खाटाच उपलब्ध नाहीत!

खासगी रुग्णालयात वेळेवर खाटाच उपलब्ध नाहीत!

【कोरोना बाबत खूप गंभीर बाब】

नांदेड/गजानन जोशी – सबला उत्कर्ष न्यूज

नांदेड – कोरोना आजाराने जिल्ह्यासह शहरात प्रचंड थैमान माजवलेले आहे,यादरम्यान मागील काही दिवसांपासून अँटिजेन तपासणी व सिटी स्कॅन तपासणी द्वारे अनेक रुग्ण कोरोना बाधित असल्याचे समोर येते आहे,सिटी स्कॅन चा स्कोअर हा सर्रास १० च्या पुढे येतो आहे,म्हणजे तो रुग्ण भरपूर संक्रमित असल्याचे यावरून सिद्ध होत असावे,व त्यांचे श्वसन क्षमता – श्वसनमापन यंत्राद्वारे तपासणी केली असता,ती सुद्धा कमी प्रमाणात येते आहे. त्यामुळे या रुग्णांना व्हेंटिलेटर (ऑक्सिजन) उपलब्ध असलेलाच बेड लागतो,कारण त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर येते आहे.

परंतु आपल्या जिल्ह्यातील जिल्हा/मनपा आरोग्य प्रशासन यांनी मागील ६ महिन्यांपासून खासगी रुग्णालयातील बेड हे ताब्यात घेतले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले,पण हे बेड उपलब्ध असल्याचे कुठे समजते याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली नसल्याचे माहिती समोर येते आहे,तुरळक नागरिकांना ही माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होत असल्याचे माहिती आहे,पण आपल्या जिल्ह्यात/शहरात जर जनजागृती होणारे काही फलक लावून या संकेतस्थळविषयी माहिती पोहचवली,तर नागरिकांना बेड शोधण्यासाठी कसरत करावी लागणार नाही.

दि.०२ एप्रिल रोजी मनपा चे एक वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह आले होते,पण कुठेही (शासकीय व खासगी) येथे बेड उपलब्ध होत नव्हता म्हणजे खूप विचारपूर्वक जिल्हा आरोग्य प्रशासनाने पाऊले उचलवयाला हवी,कारण शासकीय कर्मचारी जर बेड साठी प्रतीक्षेत राहत असतील,तर सामान्यांचे काय होत असेल?

सामान्यांच्या भावना कोण जाणून घेणार!

पालकमंत्री महोदय व इतर अधिकारी यांनी शहरात खूप बेड उपलब्ध आहेत अश्या बातम्या वारंवार ऐकण्यात येतात,हे सर्व ऐकण्यास व वाचण्यास बरे वाटते पण प्रत्यक्षात अनुभवायला गेलात तर तिथे बेड उपलब्ध नसल्याचीच माहिती मिळते.

काहीजण आपापले हितसंबंध जोपासून बेड उपलब्ध करून घेण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास येते,काहींनी अनुभव ही कथन केले,यादरम्यान प्रतीक्षा ही आहेच!

प्रशासनाने बैठका घेण्यापेक्षा जमिनीवरची स्थिती त्या त्या वेळांमध्ये(रुग्ण admit होण्याच्या वेळेत दु.०३ ते रात्री ०९) जाणून घ्यावी,तरच यावर उपाययोजना होऊ शकते…

अन्यथा “रुग्णांची प्रतीक्षा” हा विषय थांबूच शकत नाही!

तसेच विष्णुपुरी येथे रुग्णालयात असलेले कोविड संक्रमित रुग्ण यांचे नातेवाईक त्यांना जेवणाचे डब्बे आणून देत आहेत,व तेच डबे परत घरी घेऊन जात आहेत,यामुळेही संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे, याकडे जिल्हा आरोग्य प्रशासन गांभीर्याने दखल घेईल ही अपेक्षा आहे,व इथे बाहेरून येणारा डब्बा बंदच करावा,रुग्णलयात दिले जाणारे डबे रुग्णांनी स्वीकारायला हवेत,अशी उपाययोजना करावी म्हणजे संक्रमण घरापर्यंत पोहचण्यास प्रतिबंध होईल…

— चौकट —

जिल्हाधिकारी साहेब आपण प्रत्यक्ष कोविड हॉस्पिटल येथे अचानकपणे व्हेंटिलेटर बेडबद्दल पाहणी करावयास हवी व बेड उपलब्ध नसल्याबाबत येत असलेल्या माहितीबद्दल तपासणी करून नागरिकांना सविस्तर माहिती देऊन दिलासा द्यावा,कारण ही चैन सहजासहजी तुटणे शक्य नाही असे वाटते.

श्री.केदार नांदेडकर
भाजपा,नांदेड

— चौकट —

कोविड संक्रमित रुग्णांसाठी खाटा किती उपलब्ध असतात,याची माहिती एका प्रसिद्धी पत्राद्वारे दु.०३ ते रात्री ०९ वाजेपर्यंत प्रति १ तासाला याची माहिती देत राहावी,तरच खाटा उपलब्ध असल्याबाबत नागरिकांना दिलासा मिळेल,अन्यथा खाटा उपलब्ध असल्याबाबत कितीही वल्गना केल्या तरीही शेवटी खाटांसाठी प्रतीक्षा हा विषय काही थांबणार नाही!

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *