नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याला ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’

नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याला ‘राष्ट्रीय जल पुरस्कार

सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधि दिल्ली

’नवी दिल्ली, 3 : सांगली जिल्हयातील अग्रणी नदिच्या पुनरुज्जीवन कार्याचीराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जलपुरस्कारासाठी जिल्हयाची निवड झाली आहे. पुढील आठवडयात हा पुरस्कारप्रदान करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल क्षेत्रातीलउत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019 चे ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ घोषित झालेआहेत. विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झाले आहेत. नदीपुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येकविभागातील सर्वोत्तम तीन जिल्हयांना पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत.पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्हयाला अग्रणी नदिच्यापुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीरझाला आहे.पश्चिम विभागात चार राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशांचासमावेश आहे. अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखलसांगली जिल्हयाच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगमअसलेली अग्रणी नदी दिडशे वर्षांपूर्वी वाहती होती. मात्र,मध्यंतरीच्याकाही दशकांत ही नदी कोरडी होती व या नदिचे काही क्षेत्र लुप्त झाले होते.तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्हयातील टंचाईग्रस्त भागातपाणी साठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचेकार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर , तासगाव आणि कवठेमहांकाळया तीन तालुक्यातील 55 कि.मी. लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्याध्यासाने कार्य केले.राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावीस्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागने वर्षानुवर्षे कोरडयापडलेल्या नदिला पुनरुज्जीवन मिळाले. नदिच्या उगमापासून खोलीकरण आणिरूंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले.हे पात्र खानापूर तालुक्यामध्ये 22 कि.मी. इतके आहे. उगमापासून तामखडी,जाधववाडी, गोरेवाडी, बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे आदी गावांतीलस्थानिकांनी या कार्यात सक्रीय श्रमदान दिले. त्यामुळे जवळपास 2 कोटीमूल्य असणारी ही कामे अवघ्या 65 लाख रुपयांमध्ये पूर्णत्वास आली.या कामांतर्गत नदीपात्रातील 3 लाख, 70 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला .त्यामुळे नदीचे पात्र 50 फूट रुंद व 6 फूट खोल करण्यात प्रशासनाला यश आले. या नदीपात्रात ठिकठिकाणी 50 ते 60 नालाबांध घालण्यात आले . त्यामुळेसाठणाऱ्या पाण्याचा लाभ परिसरातील जनतेला झाला आहे.अग्रणी नदी बारमाहीझाल्याने नदीकाठच्या 21 गावांना लाभ झाला. तसेच अग्रणी खोरे बारमाहीहोऊन या खोऱ्यातील 105 गावात जलक्रांती घडून आली.हा पुरस्कार म्हणजे अग्रणी नदी खो-यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान – आयुक्त शेखर गायकवाडराष्ट्रीय जल पुरस्कार हा अग्रणी नदी खो-यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांचासन्मान असल्याच्या भावना सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्याचेविद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशीबोलताना व्यक्त केल्या .अग्रणी नदीच्या एकूण 55 कि.मी.च्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षातपूर्ण करण्यात आले व नवीन 34 बंधारे बांधले. विशेष म्हणजे यात उगमापासूनलुप्त झालेल्या 22 कि.मी. नदी पात्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले. दिडशेवर्षांनतर अग्रणी पुन्हा प्रवाहीत झाली व सुमारे 28 हजार शेतक-यांच्याजीवनामध्ये यामुळे आनंद निर्माण झाल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले.या कार्याची प्रेरणा घेवून कर्नाटकातील तीन गावांनी लोकवर्गणीतून हेकार्य पुढे चालविले आहे ही बाबही त्यांनी यावेळी अधोरेखीत केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *