नंदुरबार येथे शेतकरी आंदोलन पाठींबा देण्यासाठी शेतमंजूर युनियनच्या वतीने निदर्शने…

नंदुरबार येथे शेतकरी आंदोलन पाठींबा देण्यासाठी शेतमंजूर युनियनच्या वतीने निदर्शने.

तळोदा (नंदुरबार) : सतिष तायडे ( सबला उत्कर्ष न्यूज ) :- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेसह विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय किसान संघर्ष समिती व अखिल भारतीय किसान सभा यांंच्या रास्ता रोको, जेल भरो आंदोलनाची हाक दिली होती.

या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा), डेमोक्रॅटिक युुथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या संघटनांचा समावेश होता.
आंदोलन मंगलसिंग चव्हाण, शामसिंग पाडवी, अनिल ठाकरे, सुभाष ठाकरे, सुदाम ठाकरे, दयानंद चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *