नंदुरबार जिल्ह्यात 187 कोटी शेतकरी कर्ज माफ; खरीपासाठीही दिले जाणार नवे कर्ज…

राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे.

नंदुरबार – सबला उत्कर्ष ( सतिष तायडे ) :- राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील 24 हजार 790 शेतकऱ्यांचे 187 कोटी 41 लाखाचे कर्ज माफ झाले असून नव्याने कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने खरीप हंगामात चांगले पीक घेता आले आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. पूर्वीचे कर्ज थकल्याने लहान शेतकऱ्यांना बियाणे आणि खतासाठी नवीन कर्ज घेणे शक्य नव्हते. अशावेळी शासनाने नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली.
शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेले 2 लाखापर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक पुनर्गठित कर्ज माफ करण्यात आले. जमीनधारणेचे क्षेत्र विचारात न घेता कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. केवळ आधार प्रमाणिकरण करून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात मोहिम स्तरावर रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे बँकेतून नव्याने कर्ज घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले.
कर्जमुक्त झालेल्या आणि नव्याने सभासद झालेल्या 25 हजार 362 शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 275 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1149 शेतकऱ्यांना 14 कोटींचे पीक कर्ज रब्बी हंगामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 1 लाखापर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. 2019-20 या वर्षात 11 हजार 709 शेतकऱ्यांना 1 कोटी 81 लक्ष रुपयांच्या व्याज सवलतीचा लाभ देण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातील 3003(44.32 लाख रु.), शहादा 5722(93.54 लाख रु.), नवापूर 1730(24.52 लाख रु.), तळोदा 1018(17.66 लाख रु.), अक्कलकुवा 73 (65 हजार रु.) आणि अक्राणी तालुक्यातील 163 (95 हजार रु.) शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला.

{लेखक
आयुष तायडे
7666338592}

Whatsapp

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *