धरण प्रकल्पासाठी 200 कोटींचा निधी मंजूर… गुलाबराव पाटील

धरणगाव प्रतिनिधी, धनराज पाटील :- सबला उत्कर्ष – गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे निम्न तापी प्रकल्पासाठी (पाडळसरे धरण) आगामी अर्थसंकल्पात 200 कोटी उपलब्ध होणार

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर,चोपडा, पारोळा, धरणगाव व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या निम्न तापी प्रकल्पावरील पाडळसरे धरणाच्या कामासाठी 200 कोटी रुपयांचा निधी आगामी अर्थसंकल्पात उपलब्ध करुन देणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मान्य केले आहे अशी माहितीही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.
गेल्या वीस वर्षांपासून पाडळसरे प्रकल्पासाठी अत्यंत तुटपुंजा निधी मिळत असल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास आलेला नाही तसेच धरणाची किंमत देखील वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाबार्ड अथवा प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत समावेश करून या प्रकल्पासाठी आणखी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आपण राज्य शासनाकडे केली होती.त्या मागणीला यश आले असल्याची माहितीही मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *