देवेंद्रजी फडणवीस विधानसभा विरोधी पक्षनेते यांची गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा तालुक्यातील पुरग्रस्त गावांना भेट…

          गडचिरोली:सबला उत्कर्ष ग्रामीण प्रतिनिधी - नुकत्याच वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदी लगतची गावे व शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याची दखल घेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ.कृष्णा गजबे यांच्या विनंतीवरून आज गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज/वडसा तालुक्यातील सावगी, आमगाव व वडसा शहर येथील नुकसानीची पाहणी केली.

तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडे पाठपुरावा करून लवकरच नुकसान भरपाई मिळवून देणार असे आश्वासन दिले.
पूर्व विदर्भातील परिस्थिती खूपच गंभीर आहे.
केवळ आजपुरते नाही, तर अनेकांचे भविष्याचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली, तरच त्यांना पुढच्या काळासाठी उभे करता येईल. पण, त्यासाठी आज तातडीने पंचनामे करून मदत देण्याची गरज आहे. या सार्‍याच शेतकर्‍यांचे वेदना-दु:ख मोठे आहे.
राहायला घरं नाहीत आणि शेती पूर्णत: उद्धवस्त झालेली. संकट मोठे असले तरी तातडीने आणि रोखीने मदत दिली, तर अनेक कुटुंब सावरता येतील. राज्य सरकारने निर्णयशून्यता बाजुला सारत तातडीने मदत करावी.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मा अशोक जी नेते साहेब खासदार गडचिरोली/चिमूर लोकसभा क्षेत्र, मा किसनजी नागदेवे साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष गडचिरोली,आ.कृष्णा गजबे आरमोरी वि स क्षेत्र,आ.डॉ देवरावजी होळी साहेब गडचिरोली वि स क्षेत्र, आ.डॉ परिनयजी फुके साहेब ,मा.बाबुरावजी कोहळे, श्री.नानाभाऊ नाकाडे जि प सदस्य गडचिरोली,श्रीमती शालूताई दंडवते नागराध्यक्षा न प देसाईगंज,मा.मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष न प देसाईगंज, भाजपा तालुका अध्यक्ष राजेश जेठाणी, ,जि.प.सदस्य,प.स.सदस्य, नगर परिषद सदस्य,ग्राम पंचायत सरपंच,उपसरपच,सदस्य,मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *