दिं.२६ नोव्हेंबर चा देशव्यापी संप यशस्वी करण्याचा निर्धार…

दिं.२६ नोव्हेंबर चा देशव्यापी संप यशस्वी करण्याचा निर्धार.
धुळे : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- धुळे देशातील बलाढ्य कामगार, कर्मचारी, शिक्षक संघटनांनी सर्व कामगार कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, खाजगीकरण ,उदारीकरण ,
कंत्राटीकरण, धोरण रद्द करा आऊटसोर्सिंग ,फिक्स पे ,तासिका तत्त्वावर सेवा भरती बंद करा, अंशकालीन व कंत्रांटी कामगार कर्मचार्यांना सेवेत नियमित करा , रिक्त पदे भरा, शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा, शासकीय व सार्वजनिक उद्योगातील कामगार कर्मचार्यांना सक्तिने निवृत्त करण्याचे धोरण रद्द करा,बक्षी समिती चा अहवाल स्विकारा, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व भत्ते राज्यातील कर्मचारी व शिक्षकांना द्या.बेरोजगारांना काम द्या, बेरोजगारांना वाढीव भत्ता द्या, महागाई कमी करा आदी मागण्या कडे लक्ष वेधण्यासाठी दिं २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे,तो यशस्वी करण्यासाठी पाचवी नियोजन बैठक दिं.२१ नोव्हेंबर रोजी कल्याण भवन धुळे येथे बँक युनायटेड फोरम चे संजय गिरासे यांचे अध्यक्षतेखाली व संयुक्त समिती चे निमंत्रक डॉ संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली, सदरहू बैठकीस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अशोक चौधरी, सुधीर पोतदार, रत्नाकर वसईकर,उदय पाठक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ चे एस तु तायडे,वाल्मिक चव्हाण, नागेश कंडारे,सिटु चे एल आर राव, माध्यमिक शिक्षक संघटनेचे हर्षेल पवार, अविनाश भदाणे, प्राथमिक शिक्षक समिती चे राजेंद्र पाटील,बापु पारधी,एन मुक्टो चे प्रा संजय सोनवणे, प्रा डॉ जितेंद्र तलवारे,प्रा डॉ पावरा सफाई कर्मचारी संघटनेचे धनराज पिवाल,आयटक चे पोपट चौधरी, वसंत पाटील,ईंटक चे प्रमोद सिसोदे,बि एस एन एल चे संजय नागणे एम एस इ बी वर्कस फेडरेशन चे नाना पाटील,एम जी धिवरे अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस चे लक्ष्मण चांगरे,सजन सबगीते, वैद्यकीय विक्री प्रतिनिधी संघटनेचे प्रशांत वाणी, राजेश कुलकर्णी, हमाल कामगार संघटनेचे गंगाराम कोळेकर,श्याम नेवाडकर,दत्तु पाटील डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद चे शालिक बोरसे आदी विविध संघटना च्या पदाधिकारी नीं बैठकीत सहभागी होऊन आपापल्या संघटनांच्या प्रलंबित मागण्या व समस्या वर उहापोह केला, केंद्र व राज्य सरकार च्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ लाक्षणिक संप यशस्वी करण्यासाठी आपापल्या कार्यालय व कामांच्या ठिकाणी द्वार सभा घेऊन कर्मचार्यांना संपात व मोर्चात सहभागी होण्याच्या आवाहन साठी दौरे चें नियोजन करण्यात आले.


संयुक्त समिती चे निमंत्रक डॉ संजय पाटील यांनी दिं.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कल्याण भवन धुळे येथे भव्य मोर्चा त सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे
बैठकीचे अध्यक्ष संजय गिरासे यांनी केंद्र व राज्य सरकार च्या कामगार विरोधी धोरणांची व त्यांच्या विपरीत परिणामांची चर्चा केली त्याचा संताप व निषेधार्थ संप व मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले
डॉ संजय पाटील
निमंत्रक, कामगार _कर्मचारी संघटना संयुक्त समिती,धुळे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *