जळगाव मधील किसान सभाच्या मोर्च्यात खासदार उन्मेश पाटील यांची तुफान फटकेबाजी….


जळगाव किसान मोर्चात शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

जळगाव : सबला उत्कर्ष ( मयूर वागूळदे ) :- केळी फळ पीक विम्याचे निकष बदलवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.आपली विम्याची रक्कम वेळेत भरून देखील आपल्या हक्काची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्याना मिळाली नाही कारण राज्य शासनाने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि आपल्या हिस्स्याची विम्याची रक्कम भरली नाही. यामुळे शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्य शासनाने आपली १२६ कोटी रुपयांची रक्कम वेळीच भरली असती तर आज माझ्या शेतकरी बांधवांची दिवाळी अंधारात गेली नसती. अशी शेतकऱ्यांची कैफियत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मांडत पालकमंत्र्यांसह राज्य सरकारचे वाभाडे काढले आहे.


आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. यावेळी दिवसभर धरणे देत तीन वाजता बैलगाडीवर स्वार होत मोर्चा काढण्यात आला. आकाशवाणी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.यात माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन, खासदार उन्मेश दादा पाटील, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे , माजी मंत्री आमदार संजय सावकारे,आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदुभाई पटेल, महापौर ना भारतीताई सोनवणे, जि.प. अध्यक्षा ना.रंजनाताई पाटील , माजी आमदार स्मिता वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. राजेंद्र फडके, जीप उपाध्यक्ष लालचंद पाटील, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश धनके, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, भाजप महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या सह जी.प सभापती सदस्य , प.स आजी माजी सभापती सदस्य , आजी माजी नगरसेवक तसेच ज्येष्ठ, युवा कार्यकर्ते पदाधिकारी , हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत भाषण केले. ते म्हणाले
युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असताना गुलाबभाऊ नेहमी सांगायचे मला राज्यमंत्री केले असून…


चिडीमार छऱ्याची बंदुक “दिली असे सांगत होते. आता तर यांना कॅबिनेट सारखी पिस्तूल दिली आहे. आता पालकमंत्री का बरं केळी पीक उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय पाहत आहे. एकीकडे राजीनामा देण्याची यांची भाषा खर तर दुसरीकडे त्यांच्या मनामध्ये सत्तेची हाव आहे. ही भाषा दुटप्पी आहे. म्हणून मी म्हणालो होतो शिंगाडे मोर्चा काढणारे आता सोंगाडे झाले आहे. असे सांगून उन्मेश दादा पुढे म्हणाले
गुलाबभाऊ आपल्याला वाघाची शेळी झाली असं म्हटलं तर पालकमंत्र्यांना एवढा राग येण्याचे काय कारण ……
हे खरं नाही का…
साधी डीपी जळाली तरी त्यांच्या एम एस ई बी कार्यालय डोक्यावर घेणारे गुलाबभाऊ…. केळी उत्पादक शेतकऱ्यांवर होणारा अन्याय निमूटपणे का पाहत आहेत …ते गप्प आहेत….
कुठे गेला तो युती सरकारमधला शिवसेनेचा वाघ..
हा वाघ ह्या महाविकास आघाडी मध्ये शेळी झाला की काय अस प्रश्न निर्माण झाला आहे ते म्हणाले. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या भाषणाला उपस्थित शेतकऱ्यांनी वेळोवेळी टाळ्या वाजवून दाद दिली. खासदार उन्मेश दादा आपले तडाखेबंद भाषण करताना म्हणाले पालकमंत्री महोदय खूप झाली आता सलीम की कोंबडी कलीम के घर को अंडा देते ही डायलॉग बाजी आता लोक कंटाळले आहेत. केळी फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या अन्यायाविरोधात मी सातत्याने गल्ली ते दिल्ली पाठपुरावा आजही देखील सुरू ठेवला आहे. पालकमंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपण मला लक्ष करण्याऐवजी खान्देश सुजलाम-सुफलाम कसा होईल याकडे लक्ष द्यावे..
राजीनामा देण्याची भाषा बंद करावी.. आणि माझ्याकडचे लक्ष केळी फळ पिक विमा निकष बदलण्याकडे वळावे. केळी फळ पीक ऊत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा. मी शांत आहे मला शांत राहू द्या असा इशारा द्यायला देखील खासदार उन्मेश दादा पाटील विसरले नाहीत.

जिल्ह्यात खासदार उन्मेश दादा यांचे सडेतोड भाषणाची चर्चा
आज किसान मोर्चाचे शामियान्यात अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली मात्र खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या आवेशपूर्ण भाषणाची चर्चा आज सोशल मीडियावर दिसून आली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *