जळगावात पोलिसांकडून अट्टल दुचाकीचोरास अटक; पाच चोरीचा गाड्या हस्तगत..

जळगावात पोलिसांकडून अट्टल दुचाकीचोरास अटक; पाच चोरीचा गाड्या हस्तगत

जळगाव ::> शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशात एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी एका अट्टल दुचाकीचोरास अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

भय्या उर्फ गोपाळ लुका बाविस्कर (वय ३२, रा. कन्हेरे, ता. अमळनेर) असे अटक केलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. १५ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून मोहसीन शाह सलिम शाह यांची दुचाकी (एमएच- ४८, एएस- ८३०७) चोरीस गेली होती.

याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिस चोरट्याचा शोध घेत होते. दरम्यान, ही दुचाकी गोपाळ बाविस्कर याने चोरली असल्याची गुप्त माहिती पोलिस कर्मचारी किशाेर पाटील व सुधीर साळवे यांना मिळाली होती.

त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, किशाेर पाटील, सुधीर साळवे, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर आदींच्या पथकाने बाविस्कर याला खेडी परिसरातून सापळा रचून अटक केली.

पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच शहरातून चोरलेल्या पाच दुचाकीदेखील काढून दिल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी काम पाहिले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *