जळगांव येथील मेहरून परिसरामध्ये अमृत योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे…

जळगाव : सबला उत्कर्ष न्यूज ( मयूर वागूळदे ) :- जळगाव मधील रामनगर मेहरून या परिसरामध्ये अमृत योजनेचे काम करीत असताना निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे.

यामध्ये महापालिकेचे इंजिनियर चौधरी हे देखील सहभागी आहेत. स्वतःला अमृत योजनेचे मालक समजत आहेत , लोकांना दमदाटी करणे तसेच अरेरावी करणे अशा प्रकारच्या भाषा पाणीपुरवठ्याचे चौधरी साहेब करीत आहेत तरी चौधरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, परिसरातील काही नागरिक तक्रार म्हणून बोलण्यात गेल्यास त्यांना अमृत योजनेच्या जैन यांना फोन लावा जैन यांना बोलवा प्रत्येक वेळेस जैन यांचे नाव घेत आहेत व नागरिकांना धमकावत आहेत गेल्या आठ दिवसापासून रामनगर या परिसरात पाईपलाईन खोदतांना दोन ते तीन पाईप फुटले होते त्यामध्ये नळ धारकांकडून पैसे ची मागणी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर ते पाईप जोडण्यात आले. त्याचप्रकारे एक पाईप कनेक्शन गेल्या आठ दिवसापासून तुटलेली आहे. त्या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला ज्यामुळे लहान बालक वृद्ध यांना जाण्यास अडचण निर्माण होत आहे व गेल्या आठ दिवसापासून त्यांना पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही आणि चौधरी स्वतःला जैनचे हस्तक समजून लोकांना दमदाटी करणे व धमक्या देण्याचे काम करीत आहेत. चौधरी यांच्या नेहमीच या वागण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तरी त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. यावर वरिष्ठ अधिकारी यांनी दाखल द्यावी….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *