जळगांव जिल्यातील रवंजे गावाचे सुपुत्र सुदर्शन विजय भामरे यांचे सी डाक परीक्षेत 11 व्या क्रमांकाने सुयश…

जळगांव जिल्यातील रवंजे गावाचे सुपुत्र सुदर्शन विजय भामरे यांचे सी डाक परीक्षेत 11 व्या क्रमांकाने सुयश…

एरंडोल :- सबला उत्कर्ष न्यूज : एरंडोल तालुक्यातील रवंजे बु।। येथील रहिवाशी श्री विजय नामदेव भामरे ,( ग्रेडेड मुख्याध्यापक तथा अध्यक्ष, सुकेश्वर देवस्थान ) ह.मु नामाई विद्या नगर एरंडोल यांचा सुपुत्र चि. सुदर्शन उर्फ विनय भामरे यांनी नुकतेच जुहू मुंबई येथील कॉम्पुटर इन्स्टिट्यूट मधील 140 विद्यार्थ्यांमधून 11 व्या क्रमांकाने सी ड्याक परिक्षे मध्ये सुयश मिळविले आहे. त्याबद्दल त्याचे जुहू टीचर टीम व भामरे परिवारातर्फे अभिनंदन केले आहे.या सुयशानंतर लगेच होणाऱ्या कॅम्पस मधून त्यांची बी टी एस.कंपनी,गोरेगाव, मुंबई येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून यशस्वीपणे निवड करण्यात आलेली आहे.त्यांच्या या यशाबद्दल विचारले असता सतत 16 ते 20 तास लॅपटॉप वर स्टडी व ऑनलाइन कॉन्फरन्स त्यासाठी फक्त 4 तास झोप व 1 वेळ 1 च पोळी भोजन असा परिश्रम पूर्वक दिनक्रम करण्यासाठी मला माझे बाबा श्रीगुरु नामदेव भामरे व आजी स्व.पार्वताबाई भामरे यांचे आशीर्वाद लाभले असून आई वडील यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली आहे. व माझा लहान भाऊ चि वैभव भामरे याचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सुदर्शन यांचे कुटुंब…
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *