छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२१ साय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांना जाहीर…

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२१ साय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांना जाहीर.

औरंगाबाद : सबला उत्कर्ष ब्युरो – जिजाऊ बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने देन्यात येनारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२१ पुरस्कार देन्यात येत आहे.हा पुरस्कार सोहळा दि.१९-०२-२०२१ रोजी.शिवजयंतीच्या पावन पर्वावर वैजापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करन्यात येनार आहे.त्यापैकी पूर्ण नाव :- नालंदा सुंदरराव लांडगे
पद :- सहाय्यक पोलीस निरीक्षक (API)
शिक्षण :- B. Tech( Food Sci), MA ( Psychology), Yoga Diploma.

सन 2011 मध्ये पहिल्याच प्रयत्नात MPSC पास करून पोलीस उपनिरीक्षक PSI म्हणून निवड झाली.
• पहिली पोस्टिंग पुणे शहर
• दुसरी पोस्टिंग प्रमोशन वर जालना जिल्हा
• सध्या नेमणुक औरंगाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन सिल्लोड शहर.
मिळालेले पुरस्कार :-
1) कर्तबगार महिला अधिकारी म्हणून सन्मान
2) स्वयं सिद्धा महीला पुरस्कार – 2018 (जालना)
3) महाराष्ट्र नारीरत्न पुरस्कार- 2019 (जालना)
4) रोटरी क्लब ऑफ जालना होनररी मेंबर्शिप – 2018 (जालना)
5) कोरोना योद्धा सन्मान
6) राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार – 2020 (औरंगाबाद)
7) सेवा गौरव पुरस्कार – 2020 (औरंगाबाद)
• महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखर समजले जाणारे कळसुबाई शिखर पहिल्याच प्रयत्नात सर केले.
• पाचव्या जालना मॅरेथॉन मध्ये पाच किलोमीटर रनिंग
• दौडेगा भारत, दौडेगा जालना मॅरेथॉनमध्ये 10 किलोमीटर रनिंग
• रनिंगमध्ये युनिव्हर्सिटी चॅम्पियन (सलग 4 वर्ष)- 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी.
• खो-खो मध्ये शालेय, तालुका, जिल्हा, विभागीय ऑल इंडिया नॅशनल विद्यापीठ खेळाडू

• आवडते छंद :- वाचन, बाईक रायडिंग, नेचर फोटोग्राफी, म्युझिक ऐकने, कॉइन जमा करणे, पेपर कटिंग, ट्रेकिंग.
• कामगिरी :-
पोलीस दलात रुजू झाले पासून महिला व मुलींचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य, महिला विशेष तपास पथक इन्चार्ज, दामिनी पथक इन्चार्ज म्हणून काम करते, गुन्ह्यांचा तपास, पीडित महिला व बालकांचे वेळोवेळी समुपदेशन करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे.महिला व मुलींच्या अत्याचारा विषयी गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करून न्याय मिळावा, म्हणून प्रयत्न करत असते. दामिनी पथक इन्चार्ज म्हणून काम करत असताना मुलींना आत्मनिर्भर व निडर होण्यासाठी सदैव मार्गदर्शन करणे.
प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मार्गदर्शन करून “नारी सबसे भारी” असा विश्वास दिला.


लॉकडाऊन मध्ये सिल्लोड येथे कार्यरत असताना बेघर, वेडसर आणि अपंग व्यक्तींना फुड पाकीट मध्ये अन्न, चहा, पाणी दिले, गोर-गरीब लोकांना शोधून घरपोच जाऊन धान्य वाटप केले.
विविध सामाजिक संस्था एनजीओ सोबत राहून रेल्वे स्टेशन वरील बेघर लोकांना अन्न वाटप व उबदार कपडे वाटप.
रस्त्याच्या बाजूस पाल ठोकून राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने मिठाई वाटप, पाणी वाटप.
शासकीय रुग्णालयात गरोदर महिलांना फळे वाटप.
शिवजयंती, भीम जयंती निमित्त मंडळ सोबत राहून खिचडी वाटप, फळे वाटप.
विविध सामाजिक संस्था एनजीओ यांना मदत करणे.
सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग.संस्थापक अध्यक्ष अँडोकेट धनराज अंभोरे सचीव संतोष दोडे,कार्यक्रमाचे आयोजक
सुर्यकांत पाटील मोटे यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *