एकनाथराव खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग…

एकनाथराव खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग…

जळगाव : प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागन झाली आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटर अॅकाउंटवरून ट्विट पोस्ट करून माहिती दिली आहे.

एकनाथ खडसें व रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा आज सकाळी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. काही तास उलटत नाही तोच एकनाथराव खडसेंचा कोरोना चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा तीन दिवसा पूर्वी संपला. आणि आज त्यांचा देखील कोरोना चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. एकनाथ खडसेंना सौम्य लक्षणे असून ते घरीच विलगीकरणात उपचार घेत आहे.

एकनाथ खडसें यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. या आधी त्यांना ईडीची नोटीस आल्यावर चौकशी जाण्यापूर्वी कोरोना झाला होता. त्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात राहिले होते.

राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यात जनसंवाद यात्रा सुरू केली. औरंगाबाद नंतर धुळे, नंदूरबरा जिल्हा करून ते जळगाव जिल्ह्यात आले होते. रविवारी जनसंवाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील याचा कोरोना अहवाल आज सकाळी पॅाझिटिव्ह आला. त्यानंतर दुपारी एकनाथराव खडसेंचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. जनसंवाद यात्रेत कोरोना सुरक्षे संदर्भात कोणतीच काळजी घेतली नसल्याचे वारंवार दिसून आले होते. त्यात मंत्री पाटील व खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने या नेत्यांच्या संर्पकात आलेल्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंता मात्र आता वाढली आहे. खडसेंनी त्यांच्या ट्विटर पोस्टद्वारे संपर्कात आलेल्यांनी कोविड टेस्ट करावी असे आवाहन केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *