उद्योगांची वीज तोडू नका;मासिक हप्ते करून द्या – प्रदीप पेशकार…

उद्योगांची वीज तोडू नका;मासिक हप्ते करून द्या – प्रदीप पेशकार

【उद्योजक हे वीज बिल कधीही बुडविणार नाहीत!】

सबला उत्कर्ष न्यूज – गजानन जोशी.

नांदेड : कोरोनामुळे संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रातील उद्योगाचे हब म्हणून ओळखले जाणाऱ्या नाशिक शहरातही या आजाराने थैमान घातले होते,यादरम्यान लॉकडाउन (ताळेबंदी) मुळे मागील एक वर्षांपासून जिल्ह्यातील उद्योजक,छोटे व्यावसायिक सर्व सामान्य नोकरदार वर्ग प्रचंड अडचणीत असून त्यांना मोठमोठी रकमेची विजबिले दिली जात आहेत,ताळेबंदी काळात उद्योग बंद असतानाही उद्योजकांना भरमसाठ वीजबिले आलेली आहेत.

ही सर्व वीजबिले भरण्यासाठी मासिक हप्त्याची सुविधा(स्लॅब पाडून) द्यावे,याकरिता सध्या महावितरणचे कर्मचारी,अधिकारी यांचा वेगवेगळा सूर सुरू असून त्याचा फटका उद्योगांना बसत आहे,यामुळे महावितरणने हप्ते सुविधांबाबत त्यांच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी भाजपा उद्योग आघाडीने महावितरणचे अधिक्षक यांच्याकडे शुक्रवारी केली..

हप्ते करून दिलेल्या वीज ग्राहकांसमोर अनेक अडचणी उभ्या होत आहेत,याची प्रकरण निहाय सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी निवेदनासोबत दिली…

महावितरणचे याप्रकरणी सविस्तर धोरण असावे,त्याची सर्व माहिती अधिकारी कर्मचाऱ्याना असावी याकरिता जाणीवपूर्वक काम होणे गरजेचे आहे.

गत एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्यांतर्गत व्यापार काही काळ ठप्प असल्याने “उद्योजक” माझा उद्योग कसा वाढवू या विचाराने त्रस्त आहेत,यादरम्यान वीज कपात करण्याविषयी शासनाचे सक्तीचेच धोरण असल्याचे समजते..

उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर अनेक कामगार व त्यांची कुटुंबे अवलंबून असतात,याची जाणीव महावितरण मंत्री व अधिकारी यांनी ठेवणे गरजेचे आहे.

उद्योजकांची मानसिकता वीजजोडणीकडे असते,वीज तोडण्यासारख्या निर्णयामुळे उद्योग चालविण्याची मानसिक राहणार नाही याचीही काळजी ऊर्जा मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी घ्यावी…

श्री.प्रदीप पेशकार
प्रदेशाध्यक्ष-उद्योग आघाडी
महाराष्ट्र – भाजपा
तथा
सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्रालय
समिती-सदस्य,भारत सरकार

संकेतस्थळावर दिलेल्या तक्रारींचे निवारण कधी होणार,तक्रारींसाठी संकेतस्थळ तपासले जातेच की नाही अशी शंकाच आहे…

पूर्व भाजपा सरकार काळात अश्या प्राप्त तक्रारी तपासून त्यावर नागरिकांना प्रतिक्रिया देणे असे माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या काळात दखल घेतली जायची….

तसेच विद्यमान ऊर्जा मंत्री यांचे निवासस्थान हे ऎशो आरामाचे बनविले आहे,पण ते सर्व खर्च केलेले पैसे जनतेचे (आपलेच) आहेत,जनतेला वीज बिल भरा अन्यथा वीज कपात करू हे दम दिल्यासारखे वागणे कितपत योग्य आहे,महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही याचीही गुप्त माहिती मिळाली…

वीज न भरणे हे चूकीचेच आहे,पण वीज बिल भरा अन्यथा वीज कपात करू असा दम देणे तरी कितपत योग्य आहे…

श्री.आशुतोष घोलप
सेवा उद्योग समिती प्रमुख
प्रदेश सदस्य – उद्योग आघाडी,भाजपा

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *