अबब…जळगाव येथील महावितरण विभागात पैसे घेऊन भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्टर ससाणे यांचा भांडा फोड…

जळगाव – सबला उत्कर्ष न्यूज : जळगाव जिल्ह्यातील महावितरण मध्ये बाह्यसोत्र कर्मचारी पुरवण्याचा ठेका देण्यात आले आहेत त्या ठेकेदाराकडून जुने जे कर्मचारीला लागायचे असेल तर 18000 रुपये व नवीन कर्मचारीला 25000 रुपये अशी किंमत घेण्यात येत आहे . विशेष म्हणजे जे काही कर्मचारी भरले त्यांचे आयटीआय सर्टिफिकेट पण बोगस आहेत .याची माहिती सबला उत्कर्ष टीमला समजले असता कॉन्ट्रॅक्टर दहिफडे, सहकारी सुपरवायझर ससाणे शी संपर्क केला. ससाणे यांनी प्रत्यक्ष मीटिंग करण्यास सांगितले आमचा शक पक्का झाला की कुठे तरी पाणी मुरत आहे व त्यांनी न्यूज लावण्या देखील आम्हास मना केले. आम्हाला त्यांना पैसे देताना रंगेहात पकडायचे होते म्हणून मीटिंग केली असता 1 लाख 50 हजार रुपये पंधरा दिवसात देतो म्हणून सांगितले व संपादक मॅडम यांना व्हाट्सअप वर मेसेज केला की रिपोर्टर 1 लाख 50 हजार रुपये मागत आहे. काही पैसे कमी करा परंतु मॅडम यांनी काहीच उत्तर दिले नाही. कारण की त्यांना रंगेहाथ पकडायचे होते नंतर शनिवारी त्यांनी सांगितले की औरंगाबादला आम्ही पेमेंट देऊ आम्हाला सबूत सर्व द्या.आम्ही त्यांना सबूत देण्यास मना केले. त्यांना शक आला की आम्ही त्यांना पेमेंट देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाद्वारे ते आल्यावर पकडून देणार याच्या पहिलेच त्यांना आमच्या यां चालीचा काही शक आला व कॉन्ट्रॅक्टर चव्हाण , दहिफळे व संसाने या तिघांनी सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी जळगाव मयूर अनिल वाघुळदे यांना फोनवरून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
सदर वृत्त असे की ज्यांनी-ज्यांनी नोकरीसाठी पैसे दिलेत त्यांचे पूर्ण सबूत सबला उत्कर्ष समाचार टीम कडे गोपीनीय ठेवण्यात आलेले आहे.
कारण की ही गोष्ट समोर आल्यास त्या लोकांच्या जिवास देखील धोका होऊ शकतो त्यामुळे त्यांची सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात आलेली आहे.
कॉन्ट्रॅक्टर व सुपरवायझर ससाने ने 1 लाख 50 हजार रुपये देण्याची हमी का भरली ? काय खरंच गरिब कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यासाठी पैशांची माग करून पैसे वसूल करतात का? तसेच ससाने व कॉन्ट्रॅक्टर दहिफडे व चव्हाण यांची चौकशी करून गरीब कंत्राटी कामगारांना न्याय देण्यास मदत करावी.
गरीब कंत्राटी कामगार यांचे भविष्य धोक्यात आहे महावितरण तर्फे कंत्राटी यांना भरती करण्यात येते तेव्हा कोणतीही पेमेंट आकारत नाही परंतु अशा या कॉन्ट्रॅक्टर तर्फे माग करण्यात आली तर कामगारांना कितीही पेमेंट असली तरी त्यांना द्यावेच लागते कारण की नोकरीचा विषय असतो तर असेच कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन नोकरी लावतील तर आपल्या देशात बेरोजगारी वाढण्यास वेळ लागणार नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसे देऊन नोकरी करतील परंतु जे गरीब बेचारे दोन वेळचं पोट भरून आपला गुजारा करतात ते एवढे पैसे कुठून आणणार प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून अशा या कॉन्टॅक्टर , सुपरवायझर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व गरीब कामगारांना न्याय मिळवून द्यावा. व कॉन्ट्रॅक्टरने ज्यांच्याकडून पेमेंट घेतलेली आहे त्यांना ती पेमेंट वापस देण्यात यावी व सर्व कामगारांचे आयटीआय सर्टिफिकेट बोगस तर नाही याची जाच पडताळ करावी. तेथील कामगारांची मागणी आहे , की ज्यांनी आयटीआय केले आहे ते बेरोजगार आहेत आणि ज्यांनी डुबलीकेट बनविले आहेत ते आज नोकरीवर रुजू आहेत त्यावर योग्य तो आळा घालण्यात यावा.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *