अखेर त्या तीन मजल्यावरुन आईने खाली फेकलेल्या सोहम च्या दफनविधी साठि सरसावली माणुसकी समुहाची टिम

आई व मुलीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू

औरंगाबाद : शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे एका महिलेने तेरा महिन्याच्या सोहमला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. पाच वर्षीय मुलीला पण खाली फेकले आणि स्वतः तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये तेरा वर्षांचा लहान मुलगा हा जागेवरच मयत झाला आहे. घाटि हॉस्पिटलमध्ये कोणीही नातेवाईक आलेले नव्हते, पत्नी चा उपचार आय सी यू मध्ये चालू असून मुलीचा उपचार वार्ड क्र 20 घाटि हॉस्पिटल मध्ये चालू असताना, मात्र मुलाचा अंत्यविधी करण्यासाठी कुणीही आले नाही तेव्हा मात्र जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो,या प्रमाणे माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित व त्यांची टीम यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली, सुमित पंडित यांनी स्वतःत्या मुलाला उचलून बेगमपुरा स्मशान भूमी मध्ये दफनविधी करण्यात आला. फार हृदय पिळवटून टाकणारी ही घटना होती माणुसकी समूहाने त्यानां काल उपचारासाठी घाटि रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोबत कोन्हाचाच नसल्याने मदत कार्य चालू केले. समाजसेवक सुमित पंडित यांनी तात्काळ उपचारासाठी मदत कार्य केले आहे. महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले असून लहान मुलीच्या डोक्याला जबर मार लागला आहे. पाय पूर्णतः फॅक्चर झाला आहे तसेच त्या महिलेवर वार्ड क्रमांक 20 मध्ये उपचार सुरू आहे. माणुसकी समूहाने व्हाँट्सप ग्रुप च्या सदस्यांनी दहा हजार रुपयांची मदत करीत मेडिकल चा खर्च उचलला आहे.महिलेचा पती सदरील कंपनीत कामावर गेला असता ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले.
या कार्यासाठी अनील दरक,
अनिल लुनीया,जगन शीरसाठ,
आप्पासाहेब गायके,किशोर माने,राजु पालीवाल,गजानन क्षिरसागर,समाजसेवक सुमित पंडित, पुजा पंडित,यांनी सहकार्य केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *