अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे धरणगाव येथे लहान झाडांना पाणी देण्यात आले…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे धरणगाव येथे लहान झाडांना पाणी देण्यात आले.

सबला उत्कर्ष, धरणगाव प्रतिनिधी,धनराज पाटिल:- ह्या कोरोनाकाळात आज महागडे ऑक्सिजन जास्तीचे पैसे देऊन सुद्धा वेळेवर मिळत नाही, ते महागडे ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णाचे नातेवाईकांना कोणत्या हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत असतील ते केवळ त्यांनाच माहीत. परंतु हेच झाड आपल्याला निरंतर मोफत ऑक्सिजन पुरवठा करीत आपल्याला त्याची थोडी देखील किंमत नाही.
परंतु आपण पर्यावरणाला काही देणे लागतो याची जाणीव ठेवून आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव शाखेच्या वतीने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात तसेच धरणगाव रेल्वे स्टेशन परिसरातील झाडांना टॅंकर द्वारे पाणी देण्यात आले.
त्या प्रसंगी अभाविप शहरमंत्री इच्छेश काबरा, जिगर सुर्यवंशी, सागर महाजन, पराग चौधरी, रोहित पाटील, अक्षय वाणी, प्रथमेश भावसार, यश पाटील, वेदांत भट, दिपक पाटील व महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कैलास माळी सर यांनी टॅंकर उपलब्ध करुन दिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *