बापरे…दारूबंदी करणाऱ्या गावाला 51 लाखांचा निधी मिळणार या आमदाराने केली मोठी घोषणा..!

बापरे…दारूबंदी करणाऱ्या गावाला 51 लाखांचा निधी मिळणार या आमदाराने केली मोठी घोषणा!

आमदार अनिल पाटील यांची घोषणा

जिल्ह्यात पहिल्यांदा महाविकास आघाडीतर्फे नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव सोहळा संपन्न.

प्रतिनिधी अमळनेर- सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- दारूबंदी करणाऱ्या गावाला 51 लाख रुपयांचा निधी आपण एक वेगळ्या स्तरावर मिळवुन लोकाभिमुख विकासासाठी वापरू असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सत्कार सोहळ्यात केले. जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग झाला असून एकाच व्यासपीठावर तालुक्यातील सर्व नवनियुक्त सदस्यांचा गौरव झाला. यावेळी व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष गजानन गव्हाणे, सेनेचे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दयाराम आण्णा पाटील, हिंमतराव पाटील, पं स समिती राजेंद्र पाटील, दळवेलचे रोहिदास पाटील, चंद्रकांत पाटील, जितेंद्र पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, गोकुळ बोरसे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, डॉ किरण पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार अनिल पाटील पुढे बोलताना म्हणाले की ग्रामपंचायत निवडणुकीत लोकल राजकारणावर असते आपापल्या कार्यकर्त्यांमध्ये लढत होती. म्हणून कोणीही जेष्ठ नेत्याने हस्तक्षेप केला नाही. आरक्षण ज्या पद्धतीने असेल त्या प्रमाणेच सरपंच होतील सदस्यांचा सन्मान करण्यासाठी मन विचार दिशा याचं नियोजन असावे यासाठी सत्कार सोहळा आयोजित करून सेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे. आपण मोठे नशीबवान आहात माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्याच मदतीने हातभार लावला म्हणून मी आज आमदार आहे. आमदार पदासाठी सर्वसामान्य माणूस स्वतः समजून या तालुक्याने काम केले. त्यातून 21 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. काम सांगणाऱ्याची गर्दी जास्त असेल तर मी नशीबवान समजेल. विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्यासाठी सकारात्मक भूमिका ठेवा गावात भविष्यात कोणत्या योजना करण्यासाठी सकारात्मक भूमिका पाठपुरावा योग्य पध्दतीने करा विकास साध्य होईल. महिलांधून 50 टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्यांना संधी मिळेल. चांगले काम करणाऱ्या सरपंचाची दखल घेतले जाईल महिलांना सक्षम करण्यासाठी पुढील पाच वर्षे प्रयत्न करू बिनविरोध 19 ठिकाणी 25 लाखांचा निधी देऊ केलेला होता त्यापैकी 15 लाख रु प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरवणी यादीतून 3 कोटी रुपयांची मागणी करून उपलब्ध केला जाणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सर्वप्रथम सदस्यांचे अभिनंदन केले. जिल्ह्याचा विकास करणे आघाडीचे कर्तव्ये आहे. जिल्हा परिषदेत गावाचा विकासासाठी प्रस्ताव पाठवा जास्तीत जास्त नियोजन करा स्वच्छता गृह प्राधान्य द्यावे पिण्याचे पाणी पोहचवा व गावात निधी येऊ द्या असे आवाहन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कदम सर यांनी केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *