जळगावात विनामास्क वाहनधारकांना ५०० रूपयांचा दंड…

जळगावात विनामास्क वाहनधारकांना ५०० रूपयांचा दंड.

जळगाव प्रतिनिधी मयुर वाघुळदे :- जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील शास्त्री टॉवर चौकात विना मास्क घालणाऱ्या वाहनधारकांवर महापालिका आणि शहर पोलीस यांनी संयुक्तरित्या प्रत्येकी ५०० रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी काही नागरीकांनी पथकाशी हुज्जत घातल्याचे दिसून आले.

जळगाव जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. ही बाबत गंभीर असल्याचे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे नियमात बदल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता नागरीकांना काही बंधने पाळावीच लागतील, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे इशारा वजा आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शास्त्री टॉवर चौकात महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या पथकाने मास्कच्या सक्तीसाठी रस्त्यावर उतरले आहे. यात ड्रिपल शिट, मास्क न घालणे यांच्यावर प्रत्येकी ५०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास मास्क न घालणाऱ्या सुमारे २०० ते २२५ जणांना दंडात्मक कारवाई केली आहे. यावेळी यावेळी नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क घालणे आणि गर्दीचे ठिकाण टाळवे असे आवाहन महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *